धुळे : अत्याधुनिक टीओडी वीजमीटर महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे जळगाव परिमंडळात देखील  बसविण्यात येत आहेत. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 31 हजार 654 टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.   हे मीटर नवतंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरूपाचे असले तरी ते प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर वीजक्षेत्रात होणे ही काळाची गरज आहे.

           ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील :- ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. त्यामुळे वीजबिलाच्या संदर्भाने होणाऱ्या ग्राहक तक्रारीतही कपात होईल. सद्यस्थितीत कृषी वर्गवारी वगळता इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. जळगाव परिमंडलात एनसीसी या एजन्सीला मीटर बसविण्याचे काम देण्यात आले असून सुरुवातीच्या काळात सरकारी कार्यालये, सरकारी  निवासस्थाने, मोबाईल टॉवर, नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी हे टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. नवीन वीजजोडणी देतानाही टीओडी मीटर बसविण्यात येत असून, सोलार नेट मीटरिंगसाठीही त्याचा वापर करण्यात आला आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 31 हजार 654 टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.  

टीओडी मीटर असल्याशिवाय सवलत मिळू शकणार नाही :- महावितरणच्या नव्या वीजदर प्रस्तावात ग्राहकाने वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरात सवलत देण्यात येणार आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. नव्याने बसविण्यात येणारे वीजमीटर अत्याधुनिक व स्मार्ट स्वरुपाचे असले तरी ते प्री-पेड नाहीत किंवा ते बसविण्यासाठी व मीटरची किंमत म्हणून ग्राहकांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकाने वापरलेल्या विजेची अचूक नोंद घेऊन योग्य वीजबिल देण्यास हे मीटर उपयुक्त ठरणार आहेत.

त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे,असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे. 

मुख्य कीवर्डस:- टीओडी मीटर (TOD Meter),पोस्टपेड सेवा (Postpaid Service),मोफत मीटर (Free Meter),वीजबिल (Electricity Bill),ग्राहक तक्रारी (Customer Complaints),वीज वितरण कंपनी (Mahavitaran, Electricity Distribution Company),ऊर्जा बचत (Energy Saving),तक्रार निवारण (Complaint Resolution)स्मार्ट मीटरिंग (Smart Metering),वीज दर (Electricity Tariff).

संक्षिप्त सारांश :- विद्युत विभागाने टीओडी  मीटर आता पोस्टपेड आणि मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना दिवसभरातील विविध वेळा (‘पीक’, ‘मिड‑पीक’, ‘ऑफ‑पीक’) नुसार वीजेचा खर्च समजून घेणे आणि वापर कमी‑जास्त करण्याचा निर्णय घेणे सुलभ होईल. टीओडी मीटरमुळे बिलांचे अचूक मोजमाप होऊन फसवणूक आणि त्रुटी कमी होतील, ज्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलांविषयीच्या तक्रारी लक्षणीयरीत्या घटण्याची अपेक्षा आहे. ही योजना ऊर्जा बचतीला देखील चालना देईल आणि वितरण कंपनीला चरमकालीन भार व्यवस्थापित करण्यात मदत करेल.असा महावितरणचा दावा आहे, महावितरणला विश्वास आहे.  

निष्कर्ष :- टीओडी मीटर मोफत व पोस्टपेड स्वरूपात देण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांचे वीजबिल अधिक पारदर्शक व अचूक होणार आहे, त्यामुळे तक्रारी कमी होतील, ऊर्जा वापरावर नियंत्रण ठेवता येईल आणि ऊर्जा बचतीला चालना मिळेल. हा निर्णय ग्राहक आणि वीज वितरण कंपन्या दोघांसाठीही फायदेशीर ठरेल.असा महावितरणचा दावा आहे, महावितरणला विश्वास आहे.  

अस्वीकरण (Disclaimer): वरील बातमी ‘मराठी संपादक’ या वेबसाईटने स्वतः तयार केलेली नाही. हि माहिती इंटरनेटवरील सार्वजनिक स्रोतांवर (News Portals/Agencies) आधारित असून ‘मराठी संपादक’ या माहितीची शहानिशा अथवा जबाबदारी घेत नाही